परत एकदा मराठीच !
नमस्कार मित्रांनो अणि मैत्रिणींनो ! कसे आहात आपण लोक ? सर्व काही ठीक ना? आज मी पुन्हा थोडे मराठी बद्दलच लिहित आहे. " आपण लोकांनी जरा मराठीचाच पुरस्कार करून , मान देऊन मराठीला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे" याच विषयावर मला बोलायचं आहे. मराठी ला किव्वा आपल्या मातृभाषेला महत्व न देता दुसऱ्या भाषेचा पुरस्कार करणे म्हणजे स्वतः पेक्षा ती भाषा ज्यांची आहे त्यांना जास्त महत्व देण्या सारखे आहे. मी म्हणतोय म्हणून नाही तर एकदा खरच हा विचार करून पहा कि कदाचित हे कारण असेल का आपण [भारत] मागे असल्याचे? "छे हे आपलं काम नाही! ती गोरी लोकच हे करू शकतात !" " अमेरिका फार भारी आहे ,त्यांच्या एवढी शक्ती आणि बुद्धिमत्ता आपल्या कडे नाही .....!" "उन्नत तंत्राद्यान बनवणे ते चीन लाच माहिती, आपण कुठून आणणार त्यांच्या इतकी सामग्री .." हे फार बुरसटलेले विचार आहेत जे आज पर्यंत आपल्याला मागे ठेवत आहेत. आणि मी या सर्वांच्या विरुद्ध विचार करतो आणि या विचारांचा मूळ हे भाषेत आहे. हे मला वाटतं . आता मी हि अशी उदाहरण देत आहे याचा अर्थ असा होत नाही कि तुम्हाला काही जह