Posts

Showing posts from July, 2013

जन्मदात्या आईस समर्पित!

हे नातं शब्दात सांगायचं असतं का?  ठरवलं तरीही ते सांगता येईल का?  माझ्यासाठी माझ्या आईचे प्रेम किती आहे, हे कोणत्या भाषेला, त्या भाषेमध्ये लिहिणं सोपं जाईल? जे आईपासून दूर राहिलेत ना त्यांना विचारा, प्रत्येक श्वासामधला आत्मविश्वास अचानक कुठे पळून जातो. जग जिंकण्याचा धैर्य ठेवणारा मी, आईची भेट झाली नाही म्हणून, हरलो नाही, पण थोडा थांबलो नक्की. असं वाचण्यात आलंय कि माझ्या वयामद्धे सर्वांनाच आईची महती कळते आणि आदर वाढतो. मुख्यतः महती काय हे आईला आणि त्या परमेश्वरालाच माहिती! दिवाळी पहाटेची आई, आणि छोट्या मोठ्या अपयशानंतर शेजारी बसलेली आई. अपयशाच्या वेळी स्वार्थी मनाला प्रेमळ वाटणाऱ्या आईला दिवाळी पहाटेच्या घडीला स्वर्गीचा आनंद द्यायला ह्या पुढे नाही विसरणार! तुमच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य यावे म्हणून किती तिचा अट्टाहास! पण इथे आईच्या आनंदाचा विचार कोणाला! शिवाजी महाराज म्हणजे देव, त्यांनी मासाहेबांचा नेहमीच आदर केला आणि त्यांना सदैव आनंदी ठेवलं. अरे पण शिवाजी महाराजच मला आईने सांगितले. मग आजवर जाणते-अजाणतेपणी आईला दुःखी मी का केले? जन्म ...