परत एकदा मराठीच !
नमस्कार मित्रांनो अणि मैत्रिणींनो !
कसे आहात आपण लोक ? सर्व काही ठीक ना? आज मी पुन्हा थोडे मराठी बद्दलच लिहित आहे. " आपण लोकांनी जरा मराठीचाच पुरस्कार करून , मान देऊन मराठीला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे" याच विषयावर मला बोलायचं आहे.
मराठी ला किव्वा आपल्या मातृभाषेला महत्व न देता दुसऱ्या भाषेचा पुरस्कार करणे म्हणजे स्वतः पेक्षा ती भाषा ज्यांची आहे त्यांना जास्त महत्व देण्या सारखे आहे. मी म्हणतोय म्हणून नाही तर एकदा खरच हा विचार करून पहा कि कदाचित हे कारण असेल का आपण [भारत] मागे असल्याचे?
"छे हे आपलं काम नाही! ती गोरी लोकच हे करू शकतात !"
" अमेरिका फार भारी आहे ,त्यांच्या एवढी शक्ती आणि बुद्धिमत्ता आपल्या कडे नाही .....!"
"छे हे आपलं काम नाही! ती गोरी लोकच हे करू शकतात !"
" अमेरिका फार भारी आहे ,त्यांच्या एवढी शक्ती आणि बुद्धिमत्ता आपल्या कडे नाही .....!"
"उन्नत तंत्राद्यान बनवणे ते चीन लाच माहिती, आपण कुठून आणणार त्यांच्या इतकी सामग्री .."हे फार बुरसटलेले विचार आहेत जे आज पर्यंत आपल्याला मागे ठेवत आहेत. आणि मी या सर्वांच्या विरुद्ध विचार करतो आणि या विचारांचा मूळ हे भाषेत आहे. हे मला वाटतं . आता मी हि अशी उदाहरण देत आहे याचा अर्थ असा होत नाही कि तुम्हाला काही जहाल वगैरे सांगणारे! नाही मी या देशांच्या विरुद्ध काही बंड वगैरे पुकारत नाहीये. मला ते परवडणारे नाही!
ते त्यांचा काम चोख करतात हो, आपण कुठे करतो? आणि ते प्रचंड आत्मविश्वास असलेली लोकं आहेत. जे लोक स्वतःच्याच भाषेत बोलणे पसंद करतात.आपण मारें म्हणतो कि "I am damn confident !" ,अहो पण हा आपला confidence तेव्हा कुठे जातो ज्या वेळेला बरोबरी मोठ्या देशांशी होते ?
(बोर होत नसेल तर पुढे वाचा!)
माझे असे सांगणे आहे कि माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो मराठीला महत्व द्या !
मी प्रांतीय वाद वगैरे या गोष्टींना खूपच कमी महत्व देतो किंबहुना मला ते मूर्ख पानाचे लक्षण वाटते. ज्या मुले भारताची गती खुंटते. मी जागतिक स्तरावरचा विचार करून सांगत आहे. जगात कोठेही गेलो तरी मराठीचे महत्व कमी होता कामा नये. आणि राष्ट्र भाषा म्हणून हिंदीलाही तितकेच महत्व दिले गेले पाहिजे.
भाषा म्हणजे संस्कृती असते. आणि संस्कृतीची किंमत कमी म्हणजे ती जपणाऱ्या लोकांचीही किंमत अपोआप कमी होते. मला हे मान्य नाही. त्या मूळे मी हा post लिहिला आहे. अहो १२००० वर्षांपासून आपण तांत्रिक तसेच वैद्यिक शास्त्रात पुढे आहोत ,मग आता का मागे राहायचे? आपले वेद संदर्भ म्हणून हेच लोक वापरतात आणि नवनवीन शोध लावतात म्हणे. हे आता आपण अमान्य केले पाहिजे.........! त्या साठी....
कृपया मी जे लिहिले आहे त्याचा एकदा विचार करा आणि उगाच समोरचा माणूस मराठी असतानाही किव्वा हिंदी असतानाही त्याच्याशी इंग्लिश मध्ये बोलू नका. जास्तीत जास्त मराठी आणि हिंदीचा वापर करा ,हा पण ऑफिस मधे आपल्या boss ला शिकवायला जाऊ नका. आपले आपले job, college संकटात आणू नका.
आणि हे सगळे राजनैतिक पातळी वरही नेवू नका.नाहीतरी राजकारणी लोकांचे काहीतरी वेगळेच चालले असते!.
ह्या विषयी लिहिण्याचे धाडस मी केले , पण मला तुम्हा सर्वांच्या मतांबद्दल धास्ती आहे.
आपण सर्व जण मला या संदर्भात थोडे तरी लिहून कळवा! जरी तुम्हाला माझे म्हणणे पटले नसेल तरी स्पष्ट लिहून कळवा !
आणि आपल्याला काही नमूद करायचे असल्यास मला कळवा, आपल्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय !
आणि फारच बोर झालं असेल तर तसाही सांगा...पण....हा अधिकार पोस्ट पूर्ण वाचलेल्या लोकांना आहे !
धन्यवाद !
Comments
Support my cause,
We want marathi as Facebook writing language.
The cause now has 97,183 members.
Their mission: Join this to make MARATHI as writing language in Facebook
Help by joining, donating, or inviting your friends!
वरील संदेश वाचा.
असा संदेश आपल्या पैकी अनेकांना आला असेल व बऱ्याच जणांनी तो आपल्या मित्रांना
फोरवर्ड केला असेल.
आपल्या सर्वांकडे मोबाईल फोन आहे, किती जणांच्या मोबाईलमध्ये मराठी भाषा वापरली आहे. आपल्यापैकी एखाद्याने मराठी / हिंदी भाषा वापरली असेल असे वाटत नाही.
फेसबुक वर मराठी भाषा आहे. सेटिंग मध्ये जावून मराठी भाषा सिलेक्ट करा.
शिवाय फेसबुक मध्ये मराठी तून लिहिताही येते.
मी लिहितो.
मग वरील संदेशाचा काय उपयोग?
परंतु कोणताही विचार न करता मला मराठीवर खूप प्रेम आहे हे दर्शविण्यासाठी
हजारो लोक वरील संदेश दुसर्यांना फोरवर्ड करीत आहेत.
प्रथम वाचा, विचार करा, नंतर फोरवर्ड करा.
जय महाराष्ट्र
majha email sudarshan_sms@yahoo.co.in