Posts

Showing posts from March, 2011

Vedic Science, an unknown truth!

नमस्कार ! परवा एका seminar ला गेलो होतो. तिथे अनेक मान्यवर उपस्थित होते. भारताचे अनेक मोठे शास्त्रज्ञ होते. मी जरा विचारपूस केली असता असे कळाले होते कि तेथे ज्यांनी भारताचा Super-Computer बनवला, ते खुद्ध डॉ.विजय भटकर उपस्थित राहणार आहेत. एवढी मोठी personality खुद्ध डोळ्यांनी पाहायला मिळणार ह्या भावनेने मी थोडा excite झालो आणि त्या seminar च्या विषया बद्दल चौकशी केली. मला expected विषय होते ते म्हणजे, 'भारत आणि Technology ' , किव्वा 'आधुनिक भारत' वगैरे. पण तो विषय अगदीच वेगळा निघाला. " वेदिक शास्त्र " !  माझे reply म्हणजे अगदी असे होते.. "काय? काय संबंध? Super-Computer बनवणारा माणूस ह्या विषयावर काय बोलू शकतो ?"  मुळातच वेदिक शास्त्रा बद्दलचे माझे अडाणीपण आणि ह्या सर्व विसंगती पाहून, मला त्या seminar ला पूर्ण एक दिवस देऊन सर्व गोष्टी जाणून घेण्याची एक विलक्षण आणि तीव्र इच्छा निर्माण झाली. आणि ते attend केल्या नंतर मिळालेल्या माहिती मुळे माझी विचार करण्याची पद्धती, दृष्टीकोन आणि आपल्या भारताबद्दल असलेल्या प्रेमाची Intensity, ह्यान्मद्धे प्रचंड फरक आले