Vedic Science, an unknown truth!
नमस्कार !
परवा एका seminar ला गेलो होतो. तिथे अनेक मान्यवर उपस्थित होते. भारताचे अनेक मोठे शास्त्रज्ञ होते. मी जरा विचारपूस केली असता असे कळाले होते कि तेथे ज्यांनी भारताचा Super-Computer बनवला, ते खुद्ध डॉ.विजय भटकर उपस्थित राहणार आहेत. एवढी मोठी personality खुद्ध डोळ्यांनी पाहायला मिळणार ह्या भावनेने मी थोडा excite झालो आणि त्या seminar च्या विषया बद्दल चौकशी केली. मला expected विषय होते ते म्हणजे, 'भारत आणि Technology ' , किव्वा 'आधुनिक भारत' वगैरे. पण तो विषय अगदीच वेगळा निघाला. " वेदिक शास्त्र " !
माझे reply म्हणजे अगदी असे होते.. "काय? काय संबंध? Super-Computer बनवणारा माणूस ह्या विषयावर काय बोलू शकतो ?"
मुळातच वेदिक शास्त्रा बद्दलचे माझे अडाणीपण आणि ह्या सर्व विसंगती पाहून, मला त्या seminar ला पूर्ण एक दिवस देऊन सर्व गोष्टी जाणून घेण्याची एक विलक्षण आणि तीव्र इच्छा निर्माण झाली. आणि ते attend केल्या नंतर मिळालेल्या माहिती मुळे माझी विचार करण्याची पद्धती, दृष्टीकोन आणि आपल्या भारताबद्दल असलेल्या प्रेमाची Intensity, ह्यान्मद्धे प्रचंड फरक आले. आणि ते सर्व फरक एकदम positive होते. मी असं काय ऐकलं कि माझी भारताबद्दल ची मतं इतकी बदलावीत? मी काय ऐकलं हे मला तुम्हाला थोडसं सांगायचं आहे.
वेदिक शास्त्र हे भारताचे १०,००० ते १५,००० वर्षांपासून असलेले एक अतिशय Intelligent शास्त्र आहे. आपण ज्या वेदांची नावे ऐकली आहेत, म्हणजे ऋग्वेद,यजुर्वेद, आयुर्वेद इत्यादी, हे वेद म्हणजे ज्ञानाचे एक असे भांडार आहेत, जे आपल्या पूर्वजांनी महत्प्रयासांनी लिहिले आहेत. आपण 'रामायण', 'महाभारत' हि 'काव्ये' मानतो. राम आणि कृष्ण ह्यांना देव मानतो. परंतु सत्य हे या पेक्षा काहीतरी वेगळच आहे. रामायण आणि महाभारत हि नुसती काव्ये नसून त्या कथा आहेत, ज्या त्यावेळी असलेल्या high -technology wars बद्दल आपल्याला सांगतात. आता तुम्ही म्हणाल अरे बंद करा हे. हा काहीही लिहतो आहे. पण मित्रांनो हे सत्य आपल्या देशाला आता बाहेरचे लोक येऊन सांगत आहेत. ते आपल्या वेदांचा अभ्यास करून त्यावर INTERNATIONAL PATENTS मिळवतात. त्यावर त्यांचे मोठे मोठे Projects implement होतात. आणि आपण मात्र आपल्याच पूर्वजांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवत आपल्याकडे असलेल्या ज्ञानभांडाराचा पुरेपूर उपयोग घेण्यास असमर्थ ठरतो.
आपल्याला माहित असलेले आणि सुमारे १८०० व्या शतकानंतर बाहेर देशातल्या शास्त्रज्ञांनी घडवलेले अनेक चमत्कार, वेदिक शास्त्रानुसार, सुमारे १५००० वर्षांपासूनच भारताला अवगत होते. जसे कि Electroplating, Electricity , Air-plane etc. ह्या सर्वांचे references आपल्याला रामायण आणि महाभारता मद्धे सापडतात. आणि आता ह्याचे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. शास्त्रज्ञांचे तर असे म्हणणे आहे कि वेदिक शास्त्र हे आत्ताच्या modern science पेक्षाहि उन्नत होते. त्याची प्रचीती येते, जेव्हा काही International शास्त्रज्ञ आपल्या रामसेतू मद्धे वापरलेल्या एकूण सर्व materials चा तपशील आणि details देण्यात असमर्थ ठरतात. जो सेतू सुमारे १५००० वर्षांपूर्वी बनवला आहे, तो कसा बनवला असेल ? ह्याचे उत्तर आजच्या Intelligent शास्त्रज्ञ कडे नाही आहे.
मला ह्या शास्त्रज्ञांबद्दल काही एक बोलण्याचा अधिकार नाही आणि माझी पात्रता हि नाही. पण हे सर्व विचार भारताची National Chemical Lab चे Director डॉ. बी. दि. कुलकर्णी [awarded as Distinguished scientist of India, by Indian govt.] ह्यांचे आहेत. लिहिण्यासाठी भरपूर आहे. परंतु ह्या विषयी लिहिण्याची ज्यांची पात्रता आहे त्यांनीच हे लिहावे. मला माझ्या देशाच्या knowledge ची आणि असलेल्या caliber ची publicity करायची आहे. आणि म्हणूनच मी हे लिहिले. माझी एकंच विनंती आहे. कोणत्याही भारतीयाला underestimate करू नका. भारता मद्धे जगाची महासत्ता होण्याचे caliber आहे, ते कॅलीबेर आपापसात भांडून वाया घालवू नका. आपण एकत्र येऊन जग जिंकू शकतो, that too शांतता कायम राखण्यासाठीच.
विचार करा आणि प्रतिक्रिया नोंदवा.
आपला
सौरभ शाम शेंडगे.
Comments