नमस्कार मित्रांनो अणि मैत्रिणींनो !
कसे आहात आपण लोक ? सर्व काही ठीक ना? नाताळ कसा गेला ? आपण बाबा खुप मजा केली. तुम्ही लोक बोर नाही ना होत माझ्या  मराठीमुळे  ?  नसेल होत तरच ठीके. हा हा हा ! आपण लोकांनी जरा मराठीचाच पुरस्कार करून , मान देऊन मराठीला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. तसे माझे काही असे म्हणणे नाही कि सगळं काही सोडून मराठीतच बोलत बसा. जिथे गरज आहे तिथे बोला कि इंग्लिश......पण उगाच फॅड म्हणून इंग्लिश बोलणे मला काही पटत नाही. मराठी ला किव्वा आपल्या मातृभाषेला  महत्व न देता दुसऱ्या भाषेचा पुरस्कार करणे म्हणजे स्वतः पेक्षा ती भाषा ज्यांची आहे त्यांना जास्त महत्व देण्या सारखे आहे. मी म्हणतोय म्हणून नाही तर एकदा खरच हा विचार करून पहा कि कदाचित हे कारण असेल का आपण मागे असल्याचे?      
"छे हे आपलं काम नाही! ती गोरी लोकच हे करू शकतात !"
" अमेरिका फार भारी आहे ,त्यांच्या एवढी शक्ती आणि बुद्धिमत्ता आपल्या कडे नाही .....!" 
हे फार बुरसटलेले विचार आहेत जे आज पर्यंत आपल्याला मागे ठेवत आहेत. आणि मी या सर्वांच्या विरुद्ध विचार करतो. आणि या विचारांचा मूळ हे भाषेत आहे. हे मला सांगायचं. आता मी हि अशी उदाहरण देत आहे याचा अर्थ असा होत नाही कि तुम्हाला काही जहाल वगैरे सांगणारे! नाही मी या देशांच्या विरुद्ध काही बंड वगैरे पुकारत नाहीये. मला ते परवडणारे नाही! अहो त्यांच्या बद्दल बोलत बसून वेळ का घालवावा आपला? ते त्यांचा काम चोख करतात हो, आपण कुठे करतो? आणि ते प्रचंड आत्मविश्वास असलेली लोकं आहेत. जे लोक स्वतःच्याच भाषेत बोलणे पसंद करतात.आपण मारें म्हणतो कि "I am damn confident !" ,अहो पण हा आपला confidence तेव्हा कुठे जातो ज्या वेळेला बरोबरी मोठ्या देशांशी होते ?
(बोर होत नसेल तर पुढे वाचा!)
माझे असे सांगणे आहे कि माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो मराठीला महत्व द्या !
नाही नाही.....मी प्रांतीय वादात जात नाहीये.....मी जागतिक स्तरावरचा विचार करून सांगत आहे. जगात कोठेही गेलो तरी मराठीचे महत्व कमी होता कामा नये. आणि राष्ट्र भाषा म्हणून हिंदीलाही तितकेच महत्व दिले गेले पाहिजे.


भाषा म्हणजे संस्कृती असते. आणि संस्कृतीची किंमत कमी म्हणजे ती जपणाऱ्या लोकांचीही किंमत अपोआप कमी होते. मला हे मान्य  नाही. त्या मूळे मी हा post लिहिला आहे. अहो १२००० वर्षांपासून आपण तांत्रिक तसेच वैद्यिक शास्त्रात पुढे आहोत ,मग आता का मागे राहायचे? आपले वेद संदर्भ म्हणून हेच लोक वापरतात आणि नवनवीन शोध लावतात म्हणे. हे आता आपण अमान्य केले पाहिजे.........! त्या साठी....
कृपया मी जे लिहिले आहे त्याचा एकदा विचार करा आणि उगाच समोरचा माणूस मराठी असतानाही किव्वा हिंदी असतानाही त्याच्याशी इंग्लिश मध्ये बोलू नका. जास्तीत जास्त मराठी आणि हिंदीचा वापर करा ,हा पण ऑफिस मधे आपल्या boss ला शिकवायला जाऊ नका. आपले आपले job, college संकटात आणू नका.
आणि हे सगळे राजनैतिक पातळी वरही नेवू नका.नाहीतरी राजकारणी लोकांचे काहीतरी वेगळेच चालले असते!.

ह्या विषयी लिहिण्याचे धाडस मी केले , पण मला तुम्हा सर्वांच्या मतांबद्दल धास्ती आहे.
आपण सर्व जण मला या संदर्भात थोडे तरी लिहून कळवा!  जरी तुम्हाला माझे म्हणणे पटले नसेल तरी स्पष्ट लिहून कळवा !
आणि आपल्याला  काही नमूद करायचे असल्यास मला कळवा, आपल्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय !
आणि फारच बोर झालं असेल तर तसाही सांगा...पण....हा अधिकार पोस्ट पूर्ण वाचलेल्या लोकांना  आहे !

धन्यवाद !

(मराठी लिहिण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करा :   http://www.google.com/transliterate/indic/marathi )


Comments

Unknown said…
जय महाराष्ट्र !!
Shri said…
bhari re. Good designing work n as usual, a good speech too. Bt ur txt isn't clearly visible go in for some contrast colors. =)

Popular posts from this blog

परत एकदा मराठीच !